अखेर...भाजपचे माजी शहराध्यक्ष भाजपला रामराम करत शिवसेनेचे पुन्हा एकदा शिवबंधन बांधले

Foto
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का. भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत तनवाणी यांनी आपल्या हातावर पुन्हा एकदा शिवबंधन बांधले. 
 

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहेत. भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत तनवाणी यांनी आपल्या हातावर पुन्हा एकदा शिवबंधन बांधले. दरम्यान, तनवाणी हे मूळचे शिवसैनिकच आहेत. ते शिवसेनेचे आमदार होते. स्थानिक राजकारणामुळे त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती.

भाजप शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक गजानन बारवाल यांनीही तनवाणी यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार संजय शिरसाट, अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद शहरात तनवाणी यांचा समर्थक वर्ग मोठा आहे. पालिका निवडणुकीत त्याचा निश्चितच शिवसेनेला फायदा होणार आहे. त्याचवेळी बदललेली राजकीय स्थिती पाहता भाजपला पालिकेमध्ये मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर स्थानिक राजकारणातही बदलाचे वारे दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला जोरदार धक्का दिला होता. औंरगाबादमध्येही महाविकास आघाडीची तशीच मूळरचना असणार असे संकेत मिळत आहेत. येथे मनसे व एमआयएम स्वबळावर लढणार असून भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहील. 
Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker